Sunday, March 30, 2008

बंड्याची रंगपंचमी

आंतरीक सौंदर्य

पहिला: काय हो काळ्यांच्या मुलीचे लग्न ठरल्याचे ऐकले!
दुसरा: हो ना..
पहिला: इतक्या कुरूप मुलीचे लग्न इतक्या लवकर ठरले म्हणजे नवलच!
दुसरा: मुलाने बाह्य सौंदर्य न पाहता आंतरीक सौंदर्य पाहिले म्हणे..
पहिला: काय करतो मुलगा?
दुसरा: X-ray मशिन ऑपरेटर आहे!

Sunday, November 11, 2007

आधुनिक आजी

एक आजी आपल्या नातीला सांगत असते.

आजी: "मुलींना घरातली सगळी कामे - कपडे धुणे, भांडी घासणे, घराची साफसफाई वगैरे यायलाच पाहिजेत."

नात: "पण ते कशाला आजी?"

आजी: "देव न करो, पण कधी नवरा आजारी पडला, काही दिवसांकरता बाहेरगावी गेला, तर काय करशील?"

Tuesday, November 6, 2007

नो बॉल

आगरकरने सतत 'नो बॉल' टाकल्यावर अंपायर काय म्हणेल?. .
.
.
.
.
.
.

"मराठी पाऊल पडते पुढे" !!!!!!!!!!

Monday, October 22, 2007

संता हॉटेलात!

संताने हॉटेलात मनसोक्त जेवण केले व हात धुवून वॉश बेसिन धुवायला सुरुवात केली. वेटरने विचारलं, ''सर, हे काय करताय?''

संता म्हणाला, ''गधड्या, तुझ्याच हॉटेलातला बोर्ड तूच वाचत नाहीस की काय? वाच ते काय लिहिलंय.''

वॉश बेसिनवर काय लिहिलेलं असणार? 'वॉश बेसिन'!!!!!

महत्वाचा लॉ

लॉ चे प्राध्यापक बाणेदार यांनी मुलांना प्रश्न विचारला,"धंदा सुरु करतांना सगळ्यात महत्वाचा लॉ कोणता?"

शेवटच्या बाकावरुन उत्तर आले,"फादर इन लॉ"

Tuesday, June 19, 2007

चॅलेंज

चार मित्र - हॉटेलात टेबलाभोवती बसलेले....
ऑर्डर घ्यायला वेटर उभा....

पहिला: एक मसाला डोसा
दुसरा : अजून एक मसाला डोसा
तिसरा : अजून एक मसाला डोसा
चौथा : चॅलेंज !!!.....