Sunday, November 11, 2007

आधुनिक आजी

एक आजी आपल्या नातीला सांगत असते.

आजी: "मुलींना घरातली सगळी कामे - कपडे धुणे, भांडी घासणे, घराची साफसफाई वगैरे यायलाच पाहिजेत."

नात: "पण ते कशाला आजी?"

आजी: "देव न करो, पण कधी नवरा आजारी पडला, काही दिवसांकरता बाहेरगावी गेला, तर काय करशील?"

Tuesday, November 6, 2007

नो बॉल

आगरकरने सतत 'नो बॉल' टाकल्यावर अंपायर काय म्हणेल?. .
.
.
.
.
.
.

"मराठी पाऊल पडते पुढे" !!!!!!!!!!

Monday, October 22, 2007

संता हॉटेलात!

संताने हॉटेलात मनसोक्त जेवण केले व हात धुवून वॉश बेसिन धुवायला सुरुवात केली. वेटरने विचारलं, ''सर, हे काय करताय?''

संता म्हणाला, ''गधड्या, तुझ्याच हॉटेलातला बोर्ड तूच वाचत नाहीस की काय? वाच ते काय लिहिलंय.''

वॉश बेसिनवर काय लिहिलेलं असणार? 'वॉश बेसिन'!!!!!

महत्वाचा लॉ

लॉ चे प्राध्यापक बाणेदार यांनी मुलांना प्रश्न विचारला,"धंदा सुरु करतांना सगळ्यात महत्वाचा लॉ कोणता?"

शेवटच्या बाकावरुन उत्तर आले,"फादर इन लॉ"

Tuesday, June 19, 2007

चॅलेंज

चार मित्र - हॉटेलात टेबलाभोवती बसलेले....
ऑर्डर घ्यायला वेटर उभा....

पहिला: एक मसाला डोसा
दुसरा : अजून एक मसाला डोसा
तिसरा : अजून एक मसाला डोसा
चौथा : चॅलेंज !!!.....

Saturday, June 16, 2007

लेले

लेले एकदा पशूवैद्याकडे जाऊन म्हणाले," अहो जरा माझ्या म्हशीला भरपूर जुलाब होण्यासाठी काहीतरी औषध द्या."

पशूवैद्य म्हणाले,"म्हशीला जुलाबाचे औषध? कशासाठी बरे?"

लेले उत्तरले,"काही नाही हो, उद्या सर्व घर आणि अंगण शेणाने सारवायचा विचार आहे."

लग्नाचा वाढदिवस

आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय करायचं आपण?'' बायकोनं विचारलं.
नवरा उत्तरला, ''दोन मिनिटे उभे राहून शांतता पाळूयात!!!'' ....................